जि. प. अध्यक्ष रंजना पाटील यांच्या गावात रॅपिड अँटिजन टेस्ट कॅम्प

 

रावेर,  प्रतिनिधी । तालुक्यातील मोरगाव खुर्द या जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या गावात रॅपिड अँटिजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये १२४ ग्रामस्थांची चाचणी केली असता पाच ग्रामस्थ पॉझिटीव्ह आढळून आलेत.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील,समाजसेवक  प्रल्हाद पाटील यांनी ग्रामपंचायत मोरगाव खुर्द यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत जन-जागृती केली. तसेच गावात अँटीजन टेस्ट कॅम्प घेण्यात आला,  यामध्ये १२४ ग्रामस्थांची  तपासणी करण्यात आली यात पाच जण पोझिटीव्ह आले. या कॅम्पसाठी आरोग्य सेवक दिनेश चौधरी, राजेंद्र भालेराव, आशावर्कर जयश्री पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सर्व गावकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.