जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार अटकेत; पाच मोटारसायकली हस्तगत

यावल/जळगाव प्रतिनिधी । कामधंदा नसल्याने मोटारसायकलींची चोरी करून पैश्यांची उधळपट्टी करून दारूच्या पार्ट्या करणाऱ्या टोळीतील चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यावल तालुक्यातील किनगाव येथून अटक केली. संशयितांकडून चोरी केलेल्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात केले आहे.. याप्रकरणी चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

store advt

पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की, सागर सुपडू कोळी (वय-२४) रा. किनगाव ता. यावल हा काहीही कामधंदे करीत नाही. मात्र कामधंदा करीत नसतांना देखील तो पैश्याची उधळपटटी करीत असुन मित्रा सोबत दारुच्या पाटर्या करीत आहे. त्याअनुषंगाने वरील पथकाने किनगाव गावात जावुन सापळा रचुन अटक केली. पोलीसांनी खाक्या दाखविताच आपण इतर तिन मित्रांसोबत मोटारसायकली चोरी करत असल्याचे कबुल करत त्याच्यासह आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे (वय-२२) रा.रथचौक, कोळीपेठ, सुदर्शन शांताराम मोरे (वय-२४)रा.तलाठी ऑफीस जवळ, मेहरुण आणि दिपक बाबुलाल खांदे (वय-२६) रा.अयोध्यानगर साईपार्क यांनाही अटक केली. त्यांनी त्यांच्या ताब्यातील नायगाव ता.यावल, आडगाव ता.यावल, डोणगाव ता. यावल, चुंचाळे ता.यावल येथुन अनुक्रमे बजाज डिस्कव्हर, होंडा शाईन, बजाज प्लॅटीना, बजाज डिस्कव्हर, हिरोहोंडा सि.डी.डिलस्क्स अशा गाडया प्राथमिक तपासात काढुन दिल्यात. यावल पोलीस स्टेशनला गुरनं ३/२०२० भादवि.क.३७९ प्रमाणे चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून संशयितांकडून अजून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येणार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना पथके स्थापन करणे कामी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी स्थानिक गुन्हेचे स.फौ.अशोक महाजन, संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दत्तात्रय बडगुजर, उमेश गिरीगोसावी, राजेंद्र पवार, मुरलीधर बारी अशा पथकातील कर्मचारी यांनी कारवाई केली.

error: Content is protected !!