जिल्ह्यात नवीन ४५६ रूग्ण आढळले; अमळनेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ४५६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यात अमळनेर, जळगाव आणि चोपडा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रकाप वाढला आहे. आज २८५ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये ४५६ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ९६ रूग्ण हे अमळनेर तालुक्यातील असून त्या खालोखाल जळगाव शहरात ७७ आणि चोपडा तालुक्यात ५६ रूग्ण संख्या वाढली आहे. तर उर्वरित जळगाव ग्रामीण- १४, भुसावळ-१५, पाचोरा-३३, भडगाव-१३, धरणगाव-२७, यावल-४, एरंडोल-१८, जामनेर-३१, रावेर-१८, पारोळा-२४, चाळीसगाव-९, मुक्ताईनगर-१३, बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४५६ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ३५४३, जळगाव ग्रामीण-७०६, भुसावळ-१०३२, अमळनेर-१०५५, चोपडा-१०६७, पाचोरा-५८८, भडगाव-६२६, धरणगाव-६५८, यावल-५२७, एरंडोल-७४८, जामनेर-१०१५, रावेर-७७८, पारोळा-५९०, चाळीसगाव-६५०, मुक्ताईनगर-४३८, बोदवड-२६३, इतर जिल्हे-५९ असे एकुण १४ हजार ३४३ रूग्णांची संख्या झाली आहे.

आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही १४ हजार ३४३ इतकी झाली आहे. यातील ९ हजार ८७३ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच २८५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ६०८ रूग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ८६२ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!