जिल्ह्यात आज ५९ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

शेअर करा !

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव कोवीड रूग्णालयाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात ५९ रूग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे ३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील सात तालुके निरंक असून यात चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर या तालुक्यांचा समवेश आहे. तर रूग्ण संख्या ५४ हजार पार गेली आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- २७, जळगाव ग्रामीण- १ , भुसावळ- ११, अमळनेर-३, यावल-४, जामनेर-३, रावेर-३, पारोळा-४, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा – २ असे एकुण ५९ रूग्ण आज आढळून आली आहेत.

प्रशासनाने आज दिलेल्या आकडेवारीनुसार एकुण ५४ हजार ४८ रूग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी ५२ हजार ३६५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३९७ रूग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज ३५ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. तर आज एकही रूग्णांचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!