जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ११९ रूग्ण बाधित आढळून आले तर २०४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. रिकव्हरी रेट ९४.३९ टक्के वर पोहचला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- १३, जळगाव ग्रामीण-१०, भुसावळ-२२, अमळनेर-५, चोपडा-८, पाचोरा-१०, भडगाव-३, धरणगाव-३, यावल-१२, एरंडोल-०, जामनेर-११, रावेर-७, पारोळा-८, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-०, बोदवड-०, इतर जिल्हा-१ असे एकुण ११९ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ११,८६४ जळगाव ग्रामीण- २५०९, भुसावळ-३८२०, अमळनेर-४३४९, चोपडा-४३०९, पाचोरा-१९२०, भडगाव-१८६८, धरणगाव-२१६८, यावल-१७२८, एरंडोल-२७८५, जामनेर-३९८६, रावेर-२१३२, पारोळा-२४७१, चाळीसगाव-३४७३, मुक्ताईनगर-१६७१, बोदवड-८१३, इतर जिल्हा-४२४ असे एकुण ५२ हजार २९० रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ४९ हजार ३५४ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून १ हजार ६८८ रूग्ण उपचार घेत आहे. आज २ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकुण १ हजार २४८ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९४.३९ टक्क्यांवर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.