जिल्हा स्थापत्य महावितरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे उपोषण स्थगित

जळगाव, प्रतिनिधी   जिल्हा स्थापत्य महावितरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या मागण्या छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या मध्यस्तीने अधिकाऱ्यांनी मान्य केल्यात. यानंतर अमोल कोल्हे यांच्या  हस्ते ज्यूस घेऊन आपले उपोषण मागे घेतले आहे.  

 

महाराष्ट्र राज्य स्थापत्य विभाग महावितरण , जळगाव येथील लाचखोर भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता अनिरुद्ध रायप्पा व सहाय्यक अभियंता सुकेश बिराजदार यांच्या जाचक व जुलमी कारभाराला कंटाळून जळगाव जिल्हा स्थापत्य महावितरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सदस्य भाग्येश ढाकणे , विवेक खर्चे , निलेश चौधरी व हर्षल सोनवणे हे  दिनांक ८  जून २०२१  पासून  आमरण उपोषणाला बसलेले होते. छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्याने अधीक्षक अभियंता कल्याण यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत आज गुरुवार १० जून रोजी  दुपारी भ्रमणध्वनीद्वारे त्यांना कळविले व उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. सदर विनंतीला मान देऊन त् छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण सोडण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी आलेल्या आश्वासनाप्रमाणे भविष्यात उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा उपोषण व इतर लोकशाही मार्गाने लढा दिला जाईल असे उपोषणकर्ते यांनी विभागाला कळविले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.