जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन द्वारा चार मे 2023 रोजी १६ वर्षाआतील मुले व मुलींकरिता जिल्हा बास्केटबॉल संघ निवड चाचणी दीपनगर येथे घेण्यात आली.

सदर निवड चाचणी केसीई सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुलाच्या एकलव्य बास्केटबॉल अकॅडमीचे नियमित विद्यार्थी खेळाडू यांची या संघात निवड करण्यात आली. मुलींच्या संघात डेलीशा पाटील, राशी राणा, नंदिनी वंजाळे तर मुलांच्या संघात भूमेश बऱ्हाटे व गौरव बागडे यांची निवड करण्यात आली. एकलव्य बास्केटबॉल अकॅडमीच्या खेळाडूंची जिल्हा बास्केटबॉल संघात निवड झाल्याबद्दल एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर व एकलव्य बास्केटबॉल अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक जितेंद्र शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.