जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा धरणगाव येथे वृक्षारोपण

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.

 

शहा ॲग्रो धरणगाव चे संस्थापक अनिल प्रेमजी डेडिया, बांभोरी केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर माळी, जि.प.मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, आदर्श शिक्षक पी.जी.पाटील यांच्या शुभ हस्ते शालेय आवारात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी व्ही.बी. चौधरी सर खर्दे हायस्कूल, मंगलदास जाधव, गोपाल विसावे, मोहन ढिवरे हिंडाल्को रेनुकूट (U P) पंडित सोनवणे, जितेंद्र सोनवणे पेंटर इतर मान्यवर उपस्थित होते. जितेंद्र पंडित सोनवणे MDO ( हिंदाल्को बिर्ला बलवाणी ) यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!