जिल्हा क्रीडा स्पर्धेत किनगाव स्कूलच्या संघाचे यश

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व के.आर. कोतकर ज्युनियर कॉलेज यांचा संयुक्त विद्यमाने १७ वर्षाआतील मुलांच्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाल्याने किनगाव इंग्लिश स्कुलने मिळवला विजय मिळविला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार २० रोजी के.आर.कोतकर ज्युनिअर कॉलेज ट्रॅक ग्राउंड धुळे रोड चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे झालेल्या स्पर्धेत किनगाव इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूलच्या संघाने चाळीसगांव संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकवला.

या सामन्यात चाळीसगांव संघाने नाणेफेक जिंकुन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगावच्या संघाने ६ गडी बाद ६५ धावा केल्या यात अभिषेक बारेला व नरसिंहा पावरा यांनी चागली फलंदाजी केली तर रोशन बारेलानेही एक ओव्हर मेडन टाकत उत्कृष्ठ गोलंदाजी केली. इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलच्या संघाने चाळीसगाव संघाचा २६ धावांनी पराभव करत विजय मिळवला. या संघात कर्णधार रोशन रमेश बारेला, शिवम कैलाश बारेला, अभिषेक बारेला, चरण रमेश पाटील, विजय नितिन वराडे, लोकेश दिलीप संगेले, नरसिंहा ढेमसिंग पावरा, विकास सुरेश पावरा, शिवराम सिताराम बारेला, दिपेश राजेंद्र पाटील, कुणाल धनराज पाटील व अमन सिराज तडवी यांनी यशस्वी कामगीरी केली.

या सर्व खेळाळुंना क्रीडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले तर विजयी संघाचे इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनिष विजयकुमार पाटील, व्यवस्थापक पुनम मनिष पाटील, प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील, उपप्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव यांच्यासह शिक्षक आणी शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content