जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल वैशाली चौधरी यांचे तेली समाजातर्फे सन्मान

जामनेर, प्रतिनिधी | खानदेश तेली समाज मंडळ जिल्हा कार्याध्यक्ष पदी नुकतीच येथील वैशाली चौधरी यांची निवड झाली आहे. याबाबत तेली समाजाच्या वतीने त्यांचा आज सन्मान करण्यात आला.

जामनेर येथील वैशाली चौधरी हे नेहमी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. तसेच समाजाच्या हितासाठी वेळोवेळी समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करीत असतात. याचीच दखल घेऊन खानदेश तेली मंडळाने जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. यापुढे आपण तेली समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी काम करणार असल्याची माहिती प्रतिनिधीशी बोलताना वैशाली चौधरी यांनी दिली आहे

यावेळी तेली समाज तालुकाध्यक्ष अजय चौधरी, उपाध्यक्ष सत्यजित चौधरी, शहराध्यक्ष निलेश चौधरी, खजिनदार वासुदेव चौधरी, संघटक तेजस चौधरी, महिला तालुकाध्यक्ष स्वाती चौधरी, दत्तात्रय पाटील, गोपाल चौधरी, रामेश्वर पाटील, निखिल भोलाणे, कल्पेश चौधरी, दीपक भोलाणे व ईश्वर चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content