जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत बोढरे येथील तरूणाने मारली बाजी

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्य स्पर्धेत तालुक्यातील बोढरे येथील उमेश चव्हाण या तरूणाने ५ हजार मिटर अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यामुळे त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

जळगावात जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, जळगावच्या वतीने जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्य स्पर्धा-२०२२ चे आयोजन २७ मार्च रोजी एम. जे. कॉलेज येथे करण्यात आले. यावेळी एकूण ३० स्पर्धकांनी सिनीअर गटात सहभाग नोंदविला. दरम्यान ५ हजार मिटरच्या या स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील उमेश पांडुरंग चव्हाण याने पुरुष गटातून प्रथम क्रमांक पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे.‌ याबाबत सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत असून पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. उमेश हा चाळीसगाव येथील य.ना. चव्हाण राष्ट्रीय महाविद्यालयात शिकत आहे. दरम्यान आईवडील हे स्वतःच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविण्यासाठी ऊसतोडणीचे कामे करतात. मात्र परिस्थितीला भांडत न बसता उमेशने आपल्या जिद्द व चिकाटीने सदर मॅरेथॉन जिंकत पहिला क्रमांक मिळविला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!