जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत शानबाग विद्यालयाचे वर्चस्व

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्टिक व पोलीस जलतरण तलाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धा मंगळवारी १५ नोव्हेंबर रेाजी सकाळी ११ वाजता पोलीस मुख्यालयातील पोलीस जलतरण तलाव येथे संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्याहस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत या स्पर्धेला जळगाव जिल्ह्यातील 70 जलतरणपटू यांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे विजेतेपद शानबाग विद्यालय सावखेडा यांनी पटकाविले उपविजेतापद काशिनाथ पलोड तर तृतीय रायसोनी हायस्कूल जळगाव हे राहिले. या स्पर्धेत वॉटर पोलोचा रंगतदार सामना देखील संपन्न झाला. स्पर्धेत ३ हायस्कूल यांनी आपला सहभाग नोंदवला होता. यापैकी शानबाग विद्यालय सावखेडा हे विजेते ठरले तर उपविजेता संघ बियाणी हायस्कूल भुसावळ राहिला. विजेता खेळाडूंना स्पोर्ट्स हाऊस जळगावचे आमीर शेख यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण ऑडिटर गजानन वखरे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र ओक, सचिव फारुक शेख, क्रीडा अधिकारी रेखा गोऱ्हाणे आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content