जिल्हास्तरीय ऑनलाईन अभंग गायन स्पर्धा

यावल,  प्रतिनिधी   । यावल तालुक्यातील डोणगाव येथील राँयल फौजी योगेशभाऊ मित्र परिवार यांनी आषाढी एकादशी निमित्ताने  जिल्हास्तरीय ऑनलाईन अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

राँयल फौजी योगेशभाऊ मित्र परिवारातर्फे आँनलाईन जिल्हा पातळीवरील अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दि.६  ते १८ जुलै सायंकाळी ७ वाजेपर्यंत ९३७०७६४३३९ या व्हाटस् प क्रमांकावर आपले नाव व गावाचे,शहराचे नाव सांगुन अभंगाचा व्हिडीओ करून पाठवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ११११ रूपये, द्वितीय बक्षीस ७५१ रूपये तर तृतीय बक्षीस ५५१ रूपये इतके ठेवण्यात आले आहे.  ही स्पर्धा सर्वांनसाठी मोफत खुली आहे. स्पर्धा जळगाव जिल्ह्यापुरती मर्यादित असून या स्पर्धेत अभंग कमीतकमी ३ व जास्तीतजास्त ५ मिनीटांचा असावा. युट्युबवरील लिंक व स्टेजवरील सादर केलेले अभंग स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. स्पर्धेचा निकाल व विजेत्याचे नाव व फोटो दि.२० जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी सोशल मिडीया व वृत्तपत्रात प्रसिद्ध केले जाईल. विजेत्यांना बक्षीसाची रक्कम फोन पे व गुगल पे द्वारे दिली जाईल. अधिक माहीतीसाठी स्पर्धकांनी ९३७०७६४३३९ व ८३२९५९५७४२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका युवक सरचिटणीस व ग्रा.प.सदस्य शांताराम अरूण पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका युवक संघटक भरत गुलाबराव पाटील यांच्यासह राँयल फौजी योगेशभाऊ पाटील मित्रपरिवार यांनी केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!