जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदूत्ववादी संघटनांचे निषेध आंदोलन

सम्राट कॉलनीतील दगडफेक प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्याची केली मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात मागील एका आठवड्यात दोन वेळा दडगफेक करून दहशत पसरवण्याच्या प्रयत्न धर्मांधांनी केला होता. एका घटनेत गुन्हा नोंद होऊनही दुसऱ्या दिवशी पुन्हा दगडफेक झाली. यामुळे जळगाव  शहरातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहणाऱ्या धर्मांधांवर तसेच या घटनांमागील सूत्रधारावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी २३ मे रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निषेध आंदोलनात करण्यात आले.

 

जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात गेल्या आठवड्यात दोन वेळा दगडफेक करून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयतन धर्मांधांनी केला होता. पहिल्या घटनेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून काहींना अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान, एक दिवस उलटत नाहीच तोच तिसऱ्या दिवशी धार्मीक स्थळावन दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. या दोन घटनेमुळे जळगाव शहरातील वातावरण गढूळ करण्यात आले. दरम्यान, पोलीसांच्या कारवाईमुळे नागरीकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जितेंद्र चौधरी, विशाल लाड, मगन चौधरी, अशोक सोनवणे, राकेश सोनवणे, दीपक मिस्तरी, कल्पेश सोनवणे, चेतन सोनवणे, शंकरलाल लुंड यांच्यासह यांच्यासह  हिंदु राष्ट्र सेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रणरागिणी आदी हिंदुत्ववादी संघटनांसह राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी आणि हिंदू बांधव उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content