जामनेर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेची कार्यकारिणी जाहीर

जामनेर, प्रतिनिधी | येथे नुकतीच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेची स्थापना करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी डॉ. अशोक कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जामनेर तालुक्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक मान्यवर लेखक, नाटककार, कलाकार यांचे वास्तव्य राहिले आहे. जामनेरच्या एकूण सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीच्या प्रवासाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेच्या माध्यमातून एक नवे आणि आश्वासक वळण मिळेल, यात संदेह नाही, असे प्रतिपादन मसापचे जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप यांनी केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी जामनेर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाना लामखेडे उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेच्या माध्यमातून वाचक चळवळ उभी करणे तसेच युवकांना साहित्य सहवासाच्या माध्यमातून नवीन दिशा देण्याचे काम निश्चितपणे पूर्ण होईल, असा आशावाद आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाप्रसंगी चाळीसगाव येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कवी मनोहर आंधळे, डॉ. नीळकंठ पाटील तसेच प्रा. सुधीर साठे यांनी मनोगते व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषद जामनेर शाखेचे मान्यता पत्र जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप यांच्या हस्ते शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अशोक कोळी, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संदीप माळी, प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. विजयेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी यांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकारणीचा आणि मार्गदर्शक मंडळाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य महामंडळावर निवड झाल्याबद्दल शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सर्वसाधारण सभा आणि उद्घाटन समारंभानंतर कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्नेहल पाटील यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम महाजन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप माळी यांनी केले. कार्यक्रमास जामनेर शहरातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक, साहित्य रसिक, सभासद, प्राध्यापक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित कार्यकारणी पुढील प्रमाणे

डॉ. अशोक कौतिक कोळी – संस्थापक अध्यक्ष, सुधाकर बळीराम चौधरी – उपाध्यक्ष, सुहास वामन चौधरी – उपाध्यक्ष, प्रा. डॉ. संदीप कडू माळी – कार्याध्यक्ष, प्रा. डॉ. विजेंद्र विश्वनाथ पाटील – प्रमुख कार्यवाह, किशोर भगवान काळे – कोषाध्यक्ष, डॉ. आशिष उल्हास महाजन – कार्यवाह, रत्नकांत वसंत सुतार – कार्यवाह, प्रा. पुरुषोत्तम प्रल्‍हाद महाजन – सदस्य, गणेश रघुनाथ राऊत – सदस्य, संदीप कौतिक गायकवाड – सदस्य, आक्रोश सुखदेव कोळी – सदस्य, मोहन जगन्नाथ सारस्वत – सदस्य, नामदेव मुरलीधर पाटोळे – सदस्य, डॉ. स्वाती मनोज विसपुते – सदस्य, स्नेहल रितेश पाटील – सदस्य व डॉ. संगीता देविदास गावंडे – सदस्य आदींचा समाविष्ट आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!