जामनेर न्यायालयात लोक अदालतीत ४०८ खटले निकाली

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय ‘क’ स्तर जामनेर, जामनेर तालुका विधी सेवा समिती आणि जामनेर वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यामानाने राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यात एकुण ४०८ खटले निकाली काढण्यात आले असून यातून २ कोटी २५ लाख ६५ हजार रूपये वसुली करण्यात आली.

लोक न्यायालयात दिवाणी कडिल २३ तर फौजदारी कडिल ४१ प्रकरणे निकाली काढणेत आली. म्हणजेच एकुण न्यायालयीन ६४ प्रलंबित प्रकरणे राष्ट्रीय लोकन्यायालयात निकाली निघाली. तर, वादपूर्व प्रकरणातून एकूण ३४४ प्रकरणे निकाली निघाली. म्हणजेच लोक अदालतीमध्ये एकुण ४०८ प्रकरणे निकाली काढणेत आली.

सदर लोकन्यायालयास ग्राम पंचायत, बँक, पतसंस्था, विज महामंडळ, बीएसएनएल, यांनी देखील मोठय प्रमाणात वादपूर्व प्रकरणात सहभाग नोंदविलेला होता. वादपूर्व प्रकरणांतून एकुण रूपये १ कोटी २ लाख ७ हजार तर न्यायालयीन प्रलंबीत खटल्यातून रूपये १ कोटी २३ लाख ५८ हजार ७५१ इतक्या रक्कमेची तडजोडीतुन वसूली करणेत आली. लोकअदालतीमध्ये एकुण रक्कम २ कोटी २५ लाख ६५ हजार ८६० रूपये तडजोड झाली.

लोक न्यायालयाची विशेषबाब म्हणजे एकाच कुटुंबातील रस्त्यावरून मुळ वाद असल्याने ५ प्रकरणे निकाली काढणेत आली. सोबतच काही कौटुंबीक खटल्यांमध्ये महिला आपले पतीसमवेत सासरी गेल्या. अश्या पक्षकारांचे लोकन्यायालयात पूष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला.

लोक अदालतीचे न्यायालयीन प्रलंबित खटल्यांचे पॅनल प्रमुख म्हणुन न्यायाधीश दि.न. चामले, तर पॅनल मेंबर रूपाली पाटिल, वादपूर्व प्रकरणांमध्ये पॅनल प्रमुख म्हणुन न्यायाधीश श्री. बी. एम. काळे, तर पॅनल मेंबर अँड.डि.व्ही. राजपूत यांनी कामकाज पाहिले. दुसरे सह न्यायाधीश पी.व्ही. सुर्यवंशी हे देखील हजर होते. सदर लोक अदालतीकरीता सरकारी वकिल कृतिका भट, अनिल सारस्वत, वकिल संघाचे अध्यक्ष के.बी. राजपूत, ॲड. एस. एम. सोनार, ए.पी. डोल्हारे, बी.एन. बावस्कर, पी.जी. शुक्ला, के.पी.बारी, डि.बी. गोतमारे, एस. वाय. वाघ, शेख, यांच्यासह वकील संघाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

Protected Content