जामनेर तालुका शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांना पाठींबा

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवून बंडखोरांचा शिवसेना जामनेर तालुक्यातर्फे निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यातील सरकारमधील काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष अडचणी सामोरे जात असून या काळामध्ये जामनेर तालुक्यातील शिवसैनिक व युवासेना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून संकटकाळी त्यांच्यासाठी आम्ही धावून जाणार अशी प्रतिक्रिया डॉ. मनोहर पाटील यांनी नगरपालिका चौकात बोलताना दिली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा व बंडखोरांचा निषेध करण्यासाठी जामनेर तालुका शिवसेना व युवा सेना तर्फे निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे डॉ. मनोहर पाटील, विश्वजीत पाटील, भरत पवार, पवन माळी, अतुल सोनवणे, गणेश पांढरे, नीलकंठ पाटील, दिपक माळी, सुमित चव्हाण, अशोक जाधव, शामराव पाटील, संजय तायडे, भैय्या गुजर, विष्णू सोनवणे, विनोद चव्हाण, उस्मान शेख, विशाल लामखेडे, मयुर पाटील, रोहन राठोड, मुकेश जाधव, रहीस खान यांच्यासह मोठ्या संख्येने युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!