जामनेर तालुक्यात संसर्ग कायम; जिल्ह्यात आज २७६ कोरोना पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यातून २७६ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. तर ५०१ रूग्ण कोरोनापासून मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज आढळून आलेल्या अहवालात पुन्हा जामनेर तालुक्यात संसर्ग वाढला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर -७३, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-३१, अमळनेर-१०, चोपडा-६, पाचोरा-१, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-३, एरंडोल-५, जामनेर-१०६, रावेर-१०, पारोळा-०, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-२, बोदवड-० आणि अन्य जिल्हा ६ असे एकुण २७६ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय आडेवारी
जळगाव शहर -११,२७८, जळगाव ग्रामीण-२४२८, भुसावळ-३४८१, अमळनेर-४१८५, चोपडा-४१५५, पाचोरा-१८६३, भडगाव-१८१९, धरणगाव-२१३१, यावल-१६३१, एरंडोल-२७६९, जामनेर-३५५५, रावेर-२०३९, पारोळा-२४२५, चाळीसगाव-२३७३, मुक्ताईनगर-१४८७, बोदवड-७९२ आणि अन्य जिल्हा ४०० असे आज एकुण ४९ हजार ७११ रूग्ण झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ८९.१२ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ४९ हजार ७११ रूग्ण आढळून आले असून ४४ हजार ३०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२०६ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता ४ हजार २०३ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.