जामनेरात जेसीबीच्या सहाय्याने काढले अतिक्रमण ; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास (व्हिडीओ)

जामनेर  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |शहरातील  मुख्य रस्ता अतिक्रमणच्या विळख्यात सापडला होता. आज नगरपालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात यावरील अतिक्रमण काढण्याल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

 

शहरातील मुख्य रस्त्यावर  मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. याचा त्रास नागरीकांना होत होता. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नगरपालिकेचा वतीने जेसीबीच्या सहाय्याने  काढण्यात आले.  शहरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला.  अतिक्रमण काढताना मुख्याधिकारी चद्रकांत भोसले, तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे,  नगर परिषद कर्मचाऱ्यांसह  तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.