जामनेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला; जिल्ह्यात आज ३३१ रूग्ण पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यातून ३३१ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. तर ६५३ रूग्ण कोरोनापासून मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज आढळून आलेल्या अहवालात जामनेर व चाळीसगाव तालुक्यात पुन्हा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहेत.

आजची आकडेवारी
जळगाव शहर -६८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-२४, अमळनेर-५, चोपडा-१२, पाचोरा-१३, भडगाव-६, धरणगाव-२, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-१०१, रावेर-८, पारोळा-३, चाळीसगाव-७३, मुक्ताईनगर-९, बोदवड-२ आणि अन्य जिल्हा १ असे एकुण ३३१ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय आडेवारी
जळगाव शहर -११,२०५, जळगाव ग्रामीण-२४१७, भुसावळ-३४५०, अमळनेर-४१७५, चोपडा-४१४९, पाचोरा-१८६२, भडगाव-१८१८, धरणगाव-२१२८, यावल-१६२८, एरंडोल-२७६४, जामनेर-३४४९, रावेर-२०२९, पारोळा-२४२५, चाळीसगाव-२३६५, मुक्ताईनगर-१४८५, बोदवड-७९२ आणि अन्य जिल्हा ३९४ असे आज एकुण ४९ हजार ४३५ रूग्ण झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ८८.६० टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ४९ हजार ४३५ रूग्ण आढळून आले असून ४३ हजार ८०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ६रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२०४ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता ४ हजार ४३० रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!