जातीपातीचे राजकारण करणाऱ्या विरूद्ध एकत्र येवुन देशाच्या विकासासाठी कार्य करा : ना .बच्चु कडु

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जाती पातीचे राजकारण करणाऱ्यांच्या विरूद्ध आपण सर्वधर्मीयांनी एकत्र येवुन देशासाठी आपल्या राज्याच्या, आपल्या शहराच्या, आपल्या गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहीजे असे प्रतिपादन राज्य मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना .बच्यु कडु यांनी जाहीर सभेत व्यक्त केले.

ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित सुर्दशन चित्र मंदीर चौकातील जाहीर सभेत बोलत होते, त्यापुर्वी यावल येथील जुने भुसावळ नाका बोरावल गेट परिसरातून ना. बच्चु कडु यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पुजन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत शहरातील बोरावल गेट ते बुरुज चौक, चोपडा मार्ग या प्रमुख मार्गाने सभास्थळा पर्यंत भव्य रॅल्ली काढण्यात आली. प्रहार जनशक्ती हा सर्वसामान्य व्यक्तिच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या माणसांचा पक्ष असून, देशात जातीवादी मंडळींच्या माध्यमातून जाती पातीच्या नावाखाली अगदी शुल्लक कारणावरून दंगली घडविली जातात. अशा वेळी आपण सर्वांनी मग तो हिन्दु असो की मुस्लीम बांधव असो यांनी आपल्या धार्मिक द्वेष भावनेला बळी न पडता देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी, आपल्या देशाच्या राज्याच्या विकासा करीता सर्वसामान्य नागरीकांच्या भल्यासाठी कार्य करावे. यावल नगर परिषदच्या साठवण तलावाच्या कामात झालेल्या संदर्भात आपण एक बैठक घेणार असल्याचेही यावेळी ना.बच्चु कडु यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे उतर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या सहपक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ना .बच्चु कडु यांच्या हस्ते दारिद्रय रेषेखालील अपंग व गरजू कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यात आली. संपुर्ण कार्यक्रमास प्रहार जनशक्तीचे धीरज चौधरी , तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे , शहराध्यक्ष तुकाराम बारी , यावल नगर परिषदचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, गोलु माळी, माजी नगरसेवक अताउल्ला खान, हाजी हकीम खाटीक, प्रहार अल्पसंख्यांक अध्यक्ष हाजी हकीम शेख, दिलीप वाणी, नितिन बारी आदी मान्यवर व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अलीम शेख, शेरखान, उमरअली कच्छी, निजाम मन्यार, जावेद खान, आसिफ खान , फिरदोस खान, रशीद कुरेशी यांच्यासह प्रहार जनशक्तीच्या सर्व पदधिकारी व कार्यक्रत्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शकील शेख यांनी केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!