जळगाव शिवसेनेतील खांदेपालटाच्या चर्चेला जोर

संजय सावंतांची बंद दाराआड खलबते

जळगाव : प्रतिनिधी । जळगाव शिवसेना महानगर पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटाची चर्चा सुरू असताना आज संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सामूहिक बैठकीपूर्वी स्थानिक नेत्यासोबत बंद दाराआड खलबते केल्याने या चर्चेला आणखी जोर आला आहे

आज संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक बोलवण्यात आली आहे. यापूर्वी बैठकीला सुरुवात करण्याआधी
शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक गणेश सोनवणे, शिवसेना उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे यांच्याशी बंद द्वार खलबते केली .

या बंद दाराआडच्या चर्चेत नंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , नगरसेवक अमर जैन, नगरसेवक इबा पटेल हेही सहभागी झाले होते . संजय सावंत यांनी गांभीर्याने काही मुद्द्यांची दाखल घेऊन जैन आणि पटेल यांना बोलावणे धाडले असावे असा तर्क लावून सामूहिक बैठकीत काय पुढे येते ? , याकडे स्थानिक शिवसैणिकांसह त्यांच्या राजकीय विरोधकांनीही उत्सुकता ताणली गेली आहे

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.