जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे सदस्यता नोंदणी अभियानास प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे सदस्यता नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात दत्तनगर मेहरूण शिवारामधून करण्यात आली.

 

गुरुवार दि. २ जून रोजी आम आदमी पार्टी सदस्यता नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानास जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज तब्बल १६० नागरिकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली. जळगाव शहर आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष योगेश हिवरकर तसेच आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्हा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इर्शाद भाई खान व रईस भाई कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख कार्यकर्ते. प्रवीण चौधरी, जाकीर पठाण, युनूस शेख, हेमराज सोनवणे, पवन खंबायत, दुर्गेश निंबाळकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!