जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

जळगाव, प्रतिनिधी ।  शहरास पाणीपुरवठा करणे कामी अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत मेहरूण मधील मरिमाता मंदिराजवळील १२०० मीमी  मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हाॅलचे  असेंब्ली बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.  

 

मेहरूण मधील मरिमाता मंदिराजवळील १२०० मीमी  मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हाॅलचे  असेंब्ली बदलण्याचे काम  आज ७ जुलै रोजी सुरु करण्यात आले आहे. तसेच वाघुर ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील अत्यावश्यक कामाकरिता वीज पुरवठा ८ जुलै रोजी बंद राहणार आहे. याकारणास्तव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. यानुसार ८  जुलैचा पाणीपुरवठा ९  जुलै  रोजी करण्यात येईल  तसेच ९   व १०   रोजी पाणीपुरवठा अनुक्रमे १०  व  ११   रोजी करण्यात येईल असे शहर अभियंता यांनी कळविले आहे

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!