जळगाव महापालिकेसाठी स्वतंत्र तहसीलदारपद निर्माण करा : अभिषेक पाटील यांची मागणी

शेअर करा !

जळगाव, प्रतिनिधी । येथे महानगरपालिकेसाठी स्वतंत्र तहसीलदारपद निर्माण करण्यात यावे अशी मागणी जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केली आहे.

महापालिका व ग्रामीण भागाअंतर्गत जवळ पास ८ लाख लोकसंख्या आहे व त्यासाठी फक्त एक तहसीलदार आहेत. याच अनुशंगाने आज अभिषेक पाटील यांनी जळगाव महानगरपालिकासाठी एक स्वतंत्र तहसीलदारपद निर्माण करून घ्यावे जेणे करून त्याचा वरचा भार ही कमी होईल. तसेच सामान्य नागरिकांचे कामे ही लवकरात लवकर होण्यास मदत मिळेल. या विषयी आज ई-मेल द्वारे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महसूलमंत्री मंत्री ना. बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. व याविषयी मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ दखल घेऊन ई-मेल महसूल विभाग देखील पाठवला आहे.

store advt
आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!