जळगाव, भडगाव व यावलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात १४४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव, भडगाव व यावलमध्ये संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून झाले आहे.

store advt

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यात आज १४४ रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक रूग्ण संख्या २४ ही जळगाव शहरातील आहे. यासोबत भडगाव आणि यावलमध्ये प्रत्येकी १९ रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-०५; भुसावळ व एरंडोल-प्रत्येकी एक; चाळीसगाव व पाचोरा-प्रत्येकी ४; जामनेर व चोपडा-प्रत्येकी ११; पारोळा-८; अमळनेर-२; धरणगाव-६; बोदवड-७; मुक्ताईनगर-९; व रावेर-१३ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ३५८२ इतकी झालेली आहे. यातील २१११ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १२२८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे जिल्ह्यात आजवर २४४ रूग्ण मृत झाले असल्याचे या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!