जळगाव तालुका काँग्रेसतर्फे मोदी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन (व्हिडीओ)

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । देशात मोदी सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन न पाळल्याच्या निषेधार्थ जळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवनासमोर पदवी प्रमाणपत्रांची होळी करून निषेध आंदोलन करण्यात आला. जळगाव तालुका काँग्रेस मनोज डिगंबर चौधरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

जळगाव तालुका काँग्रेसच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये भारत देशातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार देण्याचे आश्वासन नव्हे तर आमिष दाखवून निवडणूक जिंकून निवडून आले. आणि दोन कोटी रोजगार तर सोडाच पण दोन लाख तरूणांनासुध्दा रोजगार देवू शकले नाही. जे उद्योग धंदे सुरू होते ते सुध्दा जीएसटी टॅक्स लादून बंद पाडले आहे. आणि त्यामुळे बेरोजगार तरूणांमध्ये भर पडली आहे. तरी या मोदी सरकाच्या विरोधात ‘रोजगार दो, रोजगार दो, मोदी सरकार हाय हाय’ अशा विविध घोषणा देवून पदवीधर तरूणांनी जिल्हा काँग्रेस भवनासमोर पदवी प्रमाणपत्रांची होळी करून निषेध आंदोलन केले. यावेळी जळगाव तालुका काँग्रेसचे प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, धनराज जाधव, महिला तालुकाध्यक्ष निशा फेगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!