जळगाव जिल्हा: यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातर्फे आज बारावीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. नाशिक विभागात ९१.११ टक्क्यांनी धुळे जिल्हा अव्वल आहे. तर जळगाव जिल्ह्याचा ८९.७२ टक्के निकाल लागला आहे. जळगाव जिल्ह्यात एकुण ४६ हजार ९६४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

store advt

जळगाव जिल्ह्यात एकुण ४६ हजार ९६४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी/मार्च २०२० मध्ये घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. एकुण निकालात जिल्ह्यात ९२.९१ टक्के मिळवून मुलींनी बाजी मारली असून मुलांनी ८७.४५ टक्के गुण मिळविले आहे.

शाखा निहाय निकाल
जिल्ह्याचा एकुण ८९.७२ टक्के निकाल लागला असून यात आर्टस शाखा- ८१.५३, वाणिज्य शाखाचा ९३.१८, विज्ञान शाखेचा- ९६.९५ टक्के तर किमान कौशल्य शाखेचा ८५.६२ टक्के असा एकुण ८९.७२ टक्के आहे.

तालुकानिहाय निकाल (टक्केवारी)
तालुकानिहाय टक्केवारीत अमळनेर तालुक्याने ९३.६० टक्के बाजी मारली तर सर्वात कमी एरंडोल तालुक्याने ८२.०३ टक्के मिळविले आहे.
अमळनेर- ९३.६० टक्के , भुसावळ- ९२.७१ टक्के , बोदवड- ८७.४८ टक्के , भडगाव- ८२.८९ टक्के , चाळीसगाव- ८६.९७ टक्के , चोपडा-९१.०७ टक्के , धरणगाव – ९२.२५ टक्के , एरंडोल- ८२.०३ टक्के , जळगाव ८८.६४ टक्के , जामनेर-८८.०८ टक्के , मुक्ताईनगर- ९२.७३ टक्के , पारोळा-९१.५८ टक्के , पाचोरा- ९१.१२ टक्के , रावेर- ९१.४४ टक्के , यावल- ९०.३० टक्के , जळगाव शहर – ८८.०३ टक्के असा निकाल जाहीर झाला आहे.

जळगाव शहरातील महाविद्यालयाचा निकाल
मु.जे.महाविद्यालय (९७.२४ टक्के), नुतन मराठा महाविद्यालय (७०.४७),  नंदीनीबाई वामन मुलींची कनिष्ठ महाविद्यालय (८१. ५९), डॉ. जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय (८४.२८), हाजी नुर मो.नूर चाचा कॉलेज (९५.१२), शाहिन काझी उर्दू कनिष्ठ महाविद्यालय (८८.८८), का.ऊ.कोल्हे विद्यालय (९७.२७), सिध्दीविनायक कनिष्ठ महाविद्यालय (९१.६६), बाहेती कॉलेज (८७.५०)

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!