जळगाव आरटीओ कार्यालयासमोरील वाहनप्रतिनिधीचे आयुक्तांना निवेदन (व्हिडीओ)

शेअर करा !
जळगाव प्रतिनिधी । आरटीओ कार्यालयाच्या समोर ऑनलाईन व्यवसाय करणारे वाहन प्रतिनिधी यांनी महानगरपालिकेच्या जागेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आयुक्ता सतिष कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  ऑनलाईन वाहन धारक आपल्या म.न.पा. च्या जागेत गेल्या सहा वर्षापासून आरटीओ कार्यालयाचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा व्यवसाय करीत आहोत. गेल्या १५ दिवसांपासून आरटीओ समोरील ऑनलाईन व्यवहारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आलयात. परंतु सर्व जण स्वतःच्या वाहनांमध्ये ऑनलाईनची कामे करतो. तसेच आमच्यामुळे वाहतुकीस किंवा पायी चालणाऱ्या नागरिकांस कुठल्याही प्रकारचा त्रास होवू नये याकामी स्वखर्चाने सुरक्षा रक्षक सुध्दा नेमलेले आहे. सदरील जागेत आम्ही स्वखर्चाने सपाटीकरण करुन आमची वाहने कोणासही त्रास होणार नाही या पध्दतीने लावून आमची नित्य कामे करीत आहोत. या कोरोना महामारीच्या काळात सुरक्षीत अंतर ठेवून तसेच मास्क परिधान करुनच आम्ही जनतेची कामे करीत आहोत.  जागा ही जळगांव मनपाची हक्काची जागा असून ज्या ही वेळेस मनपा त्या जागेवर सुशोभिकरणास सुरुवात करेल त्यावेळेस आम्ही स्वखुशीने ती जागा सोडून अन्यत्र कोणालाही त्रास न होता आमची व्यवस्था करु मात्र जोपर्यंत कामास सुरूवात होत नाही तोपर्यंत ऑनलाईन व्यवसाय करण्याची मागणी वाहन प्रतिनिधी यांनी आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी निवेदनामार्फत केले आहे.
आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!