जळगाव आगारातून थेट पंढरपूर बस सेवा; उद्या शुभारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील दोन वर्षांपासून जळगाव-पंढरपूर बस सेवा विविध कारणांनी खंडित झालेली होती. ही बस सेवा उद्या बुधवार दि. १५ जून रोजी पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे जळगाव पंढरपूर बस सेवा खंडित झालेली होती. अनेक एक भाविकांनी याबाबत एसटी महामंडळाकडे पंढरपूर बस सेवा सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता या अनुषंगाने एसटी महामंडळाकडून जळगाव ते पंढरपूर बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक व इतर घटकांना देय असलेल्या सर्व सवलती या बस सेवेला लागू असल्यामुळे संबंधित प्रवाशांचा प्रवास आनंदमय होणार आहे. जळगाव ते पंढरपूरसाठी जाणारी ही बस उद्या बुधवार दि. १५ जूनपासून जळगाव बस स्थानकातून रोज सकाळी ८ वाजता सुटणार आहे तर पंढरपूरहुन जळगाव येणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळी ५ वाजता बस सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ही बस जळगाव येथून औरंगाबाद, नगर, टेंभुर्णीमार्गे पंढरपूर येथे जाईल. या बसचे पंढरपूरचे फुल तिकीट ६९५ असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३५० भाडे आकारले जाईल. त्याचप्रमाणे इतर विविध सवलतधारक प्रवाशांना देखील या बस सेवेचा किफायतशीर दरात लाभ घेता येईल. जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेऊन एसटी महामंडळात सहकार्य करावे असे आवाहन जळगाव आगाराचे आगार व्यवस्थापक पंकज महाजन यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!