जळगावात शिक्षिकेची ५ लाख ४० हजाराची ऑनलाईन फसवणूक

सायबर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील अयोध्यात नगरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने बँकेची एफडी तोडून सुमारे ५ लाख ४० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील आयोध्या नगरात २९ वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला आहे. ९ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान त्यांना अनोळखीनंबर वरून फोन आला. त्यानंतर एका व्हाट्सअप क्रमांकाच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा ऑनलाईन नियंत्रण मिळवून यूपीआय आयडीच्या माध्यमातून पीएचडीचे सांगत शिक्षीकेच्या खात्यातून ६१ हजार रुपयाची ऑनलाइन भरले त्यानंतर अज्ञात व्यक्तीने शिक्षिकेच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून ५ लाख रुपयांची एफडी तोडून त्यातील ४ लाख ७९ हजार परस्पर इतर बँके खात्यात वळविले. अशी एकुण ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. दरम्यान हा प्रकार शिक्षिकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content