जळगावात लोंबकळणाऱ्या केबलमुळे दुचाकीस्वार जखमी

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । काम आटोपून दुचाकीने घरी जात असलेल्या तरूणाच्या गळ्यात लोंबकळत केबल अडकल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास झाली. यात तरूणाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

adv final
WhatsApp Image 2020 08 11 at 2.57

याबाबत माहिती अशी की, मनिष चंद्रकांत पांढारकर (वय-२७) रा. दत्त मंदीराजवळ वाघ नगर हा तरूण एसबीआय बँकेच्या थर्ड पार्टीच्या माध्यमातून क्रेडीट कार्डचे काम करतो. दरम्यान रिंगरोडवरील एका ग्राहकांचे कागदपत्र घेण्यासाठी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जात असतांना शहरातील मु.जे.महाविद्यालयजवळ एक लोंबकळत असलेली केबल अंधारामुळे न दिसल्याने गळ्यात अडकली. यात मनिष हे गंभीर जखमी झाले आहे. जखमी झाल्यावर त्यांनी तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!