जळगावात लागोपाठ दुसऱ्या दिवशी खून : प्रचंड खळबळ

 जळगाव प्रतिनिधी । काल निमखेडी रोड परिसरात एकाचा खून झाल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज शहरात पुन्हा एक नवीन खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

याबाबत वृत्त असे की काल निमखेडी रोड परिसरात एका व्यक्तीला कौटुंबिक वादातून त्याच्याच दोन्ही मुलांनी संपवण्याची भयंकर घटना घडली होती. याप्रकरणी कालच दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. खुद्द जन्मदात्या बापाचा खून करण्याच्या या कृत्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान यानंतर आज शहरात पुन्हा एक खून झाला आहे.

यासंदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की शहरातील रथ चौकाला लागून असणाऱ्या आंबेडकर नगराच्या बाजूच्या परिसरातील राजू पंडित सोनवणे या व्यक्तीची डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान लागोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

या खूनाचा प्रकार आज सकाळी उघड झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळा भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, काल रात्री झोपमध्ये असतांनाच राजी पंडित सोनवणे यांच्या डोक्यात वार करण्यात आला असून यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती देखील गवळी यांनी दिली.

या संदर्भात मयत राजू सोनवणे यांचा मुलगा याने फिर्याद दिली आहे. यानुसार ते जिल्हा रुग्णालयात सुरक्षारक्षक होते. आंबेडकर समाज मंदिरासमोर वडिलोपार्जित रामभाऊ निवासात रात्री झोपण्यासाठी ते येत होते. त्यांच्यासोबत वृद्ध आई द्रौपताबाई व पुतण्या विशाल अनिल सोनवणे (वय २६, रा. आंबेडकरनगर रामपेठ) हे राहत होते. सोमवारी सकाळी उशिरापर्यंत ते उठलेले नव्हते. त्यांची आई द्रौपताबाई यांनी घराजवळ राहणारा युवक ओंकार शंकर सोनवणे याला बोलावत राजू सोनवणे यांना झोपेतून उठवण्यास सांगितले. ओंकारने दरवाजा ढकलून आत प्रवेश करताच त्याला सोनवणे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पलंगावर पडलेला होता. त्यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करण्यात आलेले होते. भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडालेले होते. हा प्रकार बघून तो जोरात ओरडला. धावतच खाली आला. शेजार्‍यांना या प्रकाराबाबत त्याने माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

अपर पोलिस अधीक्षक गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, शनिपेठचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोनवणे रविवारी रात्री गाढ झोपेत असताना मारेकर्‍याने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूने टणक वस्तूने एकापाठोपाठ वार केले. त्यांना प्रतिकाराचीही संधी मिळाली नाही. जीव जाईपर्यंत मारेकरी वार करीतच राहिला. त्यामुळे चेहरा ठेचला गेला. दरम्यान, या प्रकरणी मत राजू सोनवणे यांचा पुतण्या विशाल याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास विशाल सोनवणे हा घरातून जेवण करून बाहेर निघून गेला. रात्री ९.३० वाजता राजू सोनवणे हे झोपण्यासाठी वरच्या मजल्यावरील खोलीत निघून गेल्याचे आजी द्रौपताबाई यांनी सांगितले. विशाल हा काहीही काम करीत नाही. नेहमी दारू व गांजाच्या नशेत राहत असल्याने सोनवणे हे रागवायचे. त्यामुळे त्यांच्याशी विशालचे पटत नव्हते. तो घरातून निघून गेल्यानंतर त्याला कोणीही पाहिलेले नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी आता या दिशेने तपास सुरू केला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!