जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी फुले मार्केट येथून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ही रॅली फुले मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे मोटर सायकल रॅलीला सुरूवात करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक मुकुंदभाऊ सपकाळे व ऍड. राजेशजी झालटे यांच्याहस्ते निळा झेंडा दाखवुन सदर रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास हमाल मापडी कामगार संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे, अनिल अडकमोल, अमोल कोल्हे, नगरसेवक सुरेश सोनवणे, माजी नगरसेवक राजू मोरे, दिलीप सपकाळे, वाल्मिक सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी शहरातील सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश पगारे, उपाध्यक्ष सोनू आढाळे, सचिव पंकज सोनवणे, अजय गरुड, संजय सपकाळे, विक्की सोनवणे, भारत सोनवणे, मिलिंद सोनवणे, नितीन अहिरे, आनंदा तायडे, प्रकाश वाघ, संदीप वाघ, प्रताप बनसोडे, रोहन अवचारे यांनी केलेले आहे.