जळगावात प्रतापराव होगाडे यांची अवाजवी वीज बिलाबाबत जनजागृती मोहीम

जळगाव, प्रतिनिधी | कृषी व अकृषक ग्राहकांना वीजबिले अवास्तव व चुकीची दिली जात आहेत. याअवाजवी वीज बिलांबाबत प्रतापराव होगाडे हे मंगळवार दि. ११ जानेवारी रोजी जनजागृती करणार आहेत.

 

कृषी व अकृषक ग्राहकांना वीजबिले अवास्तव व चुकीची दिली जात असल्याने शेतकरी, ग्राहक यांचे नुकसान होत आहे. या अवाजवी बिलांबाबत जनजागृतीसाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे व मुकुंद माळी यांचा जनजागृती कार्यक्रम जळगाव शहरात तहसील कार्यालयनजीक पत्रकार भवनात दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी दि. ११ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे माजी विभाग अध्यक्ष कडूअप्पा पाटील, उद्योजक, व्यापारी आघाडीतर्फे सचिन चोरडिया व वीज ग्राहक संघटनेतर्फे विजय मोहरीर यांनी आयोजन केले आहे. कोविड नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होईल. सर्वांसाठी मास्क अनिवार्य आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!