जळगावात जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी साध्या पद्धतीने साजरी

जळगाव,प्रतिनिधी | मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र, मोठा व महत्त्वपूर्ण सण जश्ने ईद – मिलाद- उन – नबी जगभरात मोठ्या आनंदात, उत्साहात व जल्लोषात जुलूस काढून, रोषणाई करून साजरा केला जातो. परंतु,कोविड -19 मुळे शासनाने निर्बंध लावल्यामुळे जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी अत्यंत साधेपणाने कायद्याचा चौकटीत राहून जुलूस-ए- ईद-मिलाद-उन-नबी न काढता साजरा करण्यात आली.

 

सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा व अन्य सुन्नी मशिदी मध्ये वक्ते सुबह सादिक (सकाळी ४ ते ५.१५ वाजेदरम्यान) जश्ने विलादत हे सला तो सलाम, नात – ए -पाक पठण करण्यात आले. त्यानंतर जुलुस ( शोभायात्रा) न काढता शहरातील काही मोजके धर्मगुरू व सुन्नी मुस्लिम बांधवांनी सकाळी साडेनऊ ते दहा वाजे दरम्यान अजिंठा चौफुली येथील मुस्लिम कब्रस्तान येऊन सर्व प्रथम आयोजक सय्यद अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मौलाना जाबीर रजा अमजदी यांनी तकरिर ( प्रवचन) केली. मौलाना अब्दुल रहीम कादरी यांनी सलातो सलाम म्हटले तसेच मौलाना नौशाद साबरी यांनी नात -ए – पाक म्हटली. यानंतर सला तो सलाम, नात – ए – पाक ( प्रेषित स्तुती गीत) व फातेहा खानी पठन करण्यात येऊन मौलाना जाबीर रजा अमजदी त्यांनी ” ए अल्लाह आज के इस मुकद्ददस दिन के सदके मे हमारे अझीम मुल्क भारत मे अमन, शांती, भाईचारा अता फरमा, बेरोजगारो को जाइझ रोजगार अता कर, कोरोना और तमाम वबा बिमारियो को खत्म कर, सबको सेहत और तंदुरुस्ती अता फरमा, भारत को महासत्ता बना, सुखा आकाल, महापूर जैसी तमाम जमिनी आस्मानी आफत ब्लैय्यात से निजात अता फरमा ” त्यास सर्वांनी आमीन म्हटले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चिंता, शनिपेठ पो. स्टे.चे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, औद्योगिक वसाहत पो. स्टे. प्रताप कुमार शिकारे, ए पी आय सुरेश सपकाळे यांनी मुस्लिम बांधवांना ईद मुबारक म्हणून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आयोजक, सून्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव, सून्नी जामा मस्जिद जळगाव व जुलूस – ए – ईद – मिलाद – उन – नबी कमिटी चे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा अमजदि, मौलाना अब्दुल रहीम कादरी, मौलाना नौशाद साबरी, मौलाना रफिक रजवी, मौलाना मोहम्मद कैफ रजवि, मौलाना शमीम अख्तर, इक्बाल वजीर, मुक्तार शहा, शाकीर चीतलवाला, सय्यद उमर मोहम्मद फारुख कादरी, शेख शफी, गुलाम अहमद रजवी, शेख नूर मोहम्मद, शेख वसीम, सलीम शहा, शेख सिराज, इलियास नूरी, शकूर बादशहा, इरफान जावेद, शेख जलालुद्दीन इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी सरकार की आमद मरहबा, नबी की आमद मरहबा, मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा, नार -ए – रिसालत या रसूल अल्लाह, सरकार की आमद मरहबा, मक्की की आमद मरहबा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!