जळगावात चेन स्नॅचिंग करणारी टोळीचा पर्दाफाश; मुद्देमालासह दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून एकट्या महिलेला पाहून गळ्यातील सोन्याची मंगलपोत, पर्स व मोबाईल हिसकावून मोटारसायकलद्वारे पळ काढणारे दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक असून त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,शहरात गेल्या काही दिवसांपासून एकट्या दुकट्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगलपोत, पर्स व मोबाईल हिसकावून मोटार सायकलद्वारे पळून जाण्याच्या घटना सुरु आहेत. या घटना लक्षात घेता एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी पो.नि. विठ्ठल ससे यांनी डी.बी.पथकातील कर्मचाऱ्यांना तपास करण्यास सांगितले होते.

त्यावेळी त्यांच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. राजेश दिपसिंग राजपूत (वय-२३), वासुदेव संतोष राजपूत (वय-१९) दोन्ही रा. अलकडी वाडा, तरसोद, ता.जि.जळगाव अशी त्या चोरट्यांची नावे निष्पन्न झाली. त्यांची अंगझडती घेता त्यांच्या ताब्यातून शहरातिल विविध ठिकाणी महिलांकडून हिसकावलेले मोबाईल, एटीएम कार्ड, मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ सीएम १८७४) असा ऐवज मिळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारतर्फे अ‍ॅड. बारगजे तर आरोपींकडून अ‍ॅड.कुणाल पवार यांनी कामकाज पाहिले

यांनी केली कारवाई
सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, हे.कॉ. जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, निलेश पाटील व असिम तडवी घटनांवर लक्ष ठेवून होते. दरम्यान 2 जुलै रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास दुचाकीने भरधाव वेगातील दोन तरुण त्यांना संशयास्पद वाटले. पथकातील आनंदसिंग पाटील व सहकाऱ्यांनी त्यांना अडवले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.