जळगाव प्रतिनिधी । चारचाकी उभी केल्याच्या कारणावरुन चालक संजय परशुराम जाधव (वय २८, रा.वरसाडे, ता.पाचोरा) यांना बेदम मारहाण करण्यात आली. शनिवारी सायंाकळी ५.३० वाजता जुने बीजे मार्केट परिसरात ही घटना घडली. संजय मुंदडा व त्यांचा मुलगा (पुर्ण नाव माहित नाही) यांनी मारहाण केली आहे. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुंदडा यांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावात चारचाकी वाहन चालकाला मारहाण
5 years ago
No Comments