जळगाव प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आज लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. काँग्रेसच्या जिल्हा प्रभारी हेमलता पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
या उमेदवारांचा दावा
या दोन्ही जागांसाठी १५ जणांनी मुलाखती दिल्यात यात रावेर मतदार संघासाठी आठ तर जळगाव मतदार संघासाठी ७ उमेदवारांचा समावेश आहे. यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी प्रा.शिवाजी दौलत पाटील (पाचोरा), रजनी विश्राम पाटील (जळगाव), अशोक हरी खलाणे (चाळीसगाव), सुलोचना वाघ (अमळनेर), धनंजय चव्हाण (चाळीसगाव), ललीता पाटील (अमळनेर) आणि परवेज पठाण (जळगाव) तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी डॉ. उल्हास पाटील (जळगाव), पप्पू छबीदास पाटील, नितीन रमेश चौधरी, सुरेश निळकंठ फालक, मारूती नारायण सुरळकर (मुक्ताईनगर), शंकर शिवलाल राजपूत (जामनेर), डॉ. जगदीश पाटील (मुक्ताईनगर) आणि मुनवर खान (भुसावळ) यांनी आपला उमेदवारीचा दावा सादर केला.
पदाधिकारी उपस्थित
या मुलाखत प्रक्रियेप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अर्जून भंगाळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, ललिता पाटील, डी.जी. पाटील, योगेंद्रसिंह पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, अशोक खलाणे, रमेश चौधरी, निळकंठ फालक, ईश्वर जाधव, के.डी. चौधरी, प्रभाकर सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, आबासाहेब निकम, देवेंद्र पाटील, साहेबराव गजमल पाटील, रतीलाल चौधरी, जि.प.गटनेता प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, हितेश पाटील, राजस कोतवाल, सुलोचना वाघ, देवेंद्र मराठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
दोन्ही जागांसाठी तयारी
दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी संयुक्तरित्या लोकसभा निवडणूक लढवणार आहे की नाही याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. तरी देखील आम्ही स्थानिक पातळीवर लोकसभासाठी उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीची प्रक्रीया सुरू केली असल्याची माहिती काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी हेमलता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार आणि काँग्रेस कमीटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण असल्याने दोन्ही जागा काँग्रेस कमिटी लढविण्यासाठी तयार असल्याचे त्या म्हणाल्या.