जळगावात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक एकवटले (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एकनाथ शिंदे यांची नाराजी लवकर दुर होवून ते स्वगृही परत येतील असे मत महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केले. त्या शिवसेना शहरच्या वतीने टॉवर चौकात उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्याप्रसंगी बोलत होत्या.

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बाजूने असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्पष्ट केले. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार आणि खासदार यांनी शिवसेना कुटुंबात स्वगृही परत यावे असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना शहरच्या वतीने शिवसेना कार्यलय ते टॉवर चौकात पदयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक सचिन पाटील, प्रशांत नाईक, युवा सेनेचे शिवराज पाटील, शोभा चौधरी, सरिता माळी कोल्हे, प्रशांत सुरडकर. गजानन मालपुरे, ज्योती शिवदे, मंगला बारी, श्याम कोगटा आदी सहभागी झाले होते. टॉवर चौकात मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 

भाग १

भाग २

भाग 3

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!