जळगावात अवैध गुटख्याची वाहतूक; दोघांविरोधात गुन्हा

 

जळगाव प्रतिनिधी । शहरात बेकायदेशीर गुटखाची वाहतूक करणाऱ्या एकास दुचाकीसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले असून दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरात बेकायदेशीर दोघे जण दुचाकीवर गुटखाची वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना माहिती मिळाली. त्यानुसार रोहम यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुनिल दामोदरे, राहुल पाटील, विनायक पाटील, किरण चौधरी यांचे पथक तयार करून कारवाई करण्यास रवाना झाले. सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील अजिंठा चौफुलीवर सापळा रचून संशयित आरोपी भगवान प्रभाकर पाटील (वय-५२) आणि विजय चौधरी रा. एरंडोल बसस्थनकाजवळ एरंडोल यांना ताब्यात घेवून त्यांच्या कब्जातील ६३ हजार ९१० रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.  दोघांविरोधात भादवि कलम २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.