जळगावात अज्ञात दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू; नवीन मालधक्क्याजवळील घटना

जळगाव प्रतिनिधी । शतपावली करण्यासाठी गेलेल्या पत्नीसोबत गेलेल्या प्रौढाला अज्ञात दुचाकाची जोरदार धडक दिल्याच मृत्यू झाल्याची घटना नवीन मालधक्क्याजवळी शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी , संभाजी धनसिंग पाटील (वय-४६, रा. मुक्ताईनगर कॉलनी) हे पत्नी वर्षा संभाजी पाटील आणि दोन मुले यांच्यासह राहतात. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नोकरीस आहे. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास संभाजी पाटील हे आपल्या पत्नीसोबत शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. दरम्यान, सुरत रेल्वेजवळीत नवीन मालधक्क्यावर फिरण्यासाठी गेले. मालधक्क्यावर पायी जात असतांना एका अनोळखी वाहनाने संभाजी यांना जोरदार धडक दिली. घटना घडल्यानंतर मोटारसायकल स्वार फरार झाला होता. पती जखमी आवस्थेत पडल्याचे पाहून पत्नी वर्षा पाटील यांनी मोबाईलवरून बहिणीच्या पती सुभाष गुजर यांना माहिती दिली. सुभाष गुजर हे आपल्या मुलासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत पडलेले साडू संभाजी पाटील यांना रिक्षाने देवकर कॉलेज सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयत संभाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ परदेशी करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.