जळगावातून दुचाकी लंपास

0
14
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेरी नाक्याजवळील स्मशानभूमीच्या गेट समोर अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश पांडुरंग ढाके (वय-४१) रा. भगीरथ कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्य आहे. ते खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता निलेश ढाके हे (एमएच १९ बीएच ५१५४) या क्रमांकाच्या दुचाकीवरून नेरी नाकाच्या स्मशानभूमीच्या गेट समोर आले होते. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेले. दरम्यान आज्ञा चोट्यांनी २० हजार रूपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निलेश ढाके यांनी दुचाकीचा परिसरात शोध घेतला असता त्यांना कुठेही दुचाकी मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिश जाधव करीत आहे.