जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धमकी

शेअर करा !

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्‍हा मराठा विद्याप्रसारक समाज संचलीत नुतन मराठा महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या निवास्थानावर येवुन आठ दहा गुंडानी शिवीगाळ करुन वयोवृद्ध वडीलांसमोर आरडा ओरड केल्याची घटना घडली. या प्रकरणी प्राचार्य देशमुख यांनी अद्याप पोलिसात तक्रार दिली नसली तरी घडल्या प्रकारा बाबत वरीष्ठ पोलिस अधीकाऱ्यांना भेटून या बाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

store advt

जळगाव जिल्‍हा मराठा विद्याप्रसारक समाज संचलीत नुतन मराठा महाविद्यालयात संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाचा ताबा घेण्यावरुन गेल्या दिड-देान वर्षापुर्वी भोईटे विरुद्ध पाटील गटात धुमश्‍चक्री उडाली होती. तेव्हा पासूनच नुतन मराठा महाविद्यालयातील वाद विवाद चर्चेत असून शुक्रवार (ता.१०) रेाजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या घरावर आठ ते दहा लोकांनी येवुन गोंधळ घातला. देशमुख यांचे वयोवृद्ध वडील घरी असतांना त्यांच्या समक्ष शिवीगाळ दमदाटी केल्याचा प्रकार घडला असुन या प्रकरणी आपण कायदे शीर सल्ला घेवून तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!