जळगावच्या प्रजापत नगरात तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग

शेअर करा !

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील चौघुले प्लॉट परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहितेचा दुचाकीस्वार तरुणाने प्रजापत नगरात विनयभंग केल्याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

store advt

 

चौघुले प्लॉट परिसरात राहणारी २२ वर्षीय विवाहिता दि.२८ रोजी प्रजापत नगरात राहत असलेल्या एका नातेवाईकाकडे गेलेली होती. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास विवाहिता पायी घराकडे परतत असताना प्रजापत नगरातील हनुमान मंदिराजवळ विक्की चौधरी (पूर्ण नाव माहिती नाही) हा तरुण दुचाकीवरून गेला. पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिले आणि दुचाकी घेऊन परत आला. विक्की चौधरी याने विवाहितेचा हात धरत शिवीगाळ करून तुझा नवरा खूप मातला आहे, त्याला सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच विवाहितेचा पदर धरत जवळ पडलेली वीट फेकून मारली. वीट विवाहितेच्या पोटावर लागल्याने तिने आरडाओरड केली असता जवळ असलेले काही तरुण धावून आले. तरुण येताच विक्की चौधरी दुचाकी घेऊन पळून गेला. पोटाला मार लागल्याने विवाहितेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून आल्यानंतर याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून विक्की चौधरी विरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार अरुण सोनार करीत आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!