जयपूरमध्ये घोडेबाजार होत होता, याचा आमच्याकडे पुरावा आहे : मुख्यमंत्री अशोक गहलोत

शेअर करा !

जयपूर (वृत्तसंस्था) जयपूरमध्ये घोडेबाजार होत होता, याचा पुरावा आमच्याकडे आहे. आम्हाला आमदारांना 10 दिवसांसाठी हॉटेलमध्ये ठेवावे लागले, जर आपण ते केले नसते तर मानेसरमध्ये (हरियाणा) जी गोष्ट घडली, तीच परत घडली असती असा दावा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे.

store advt

 

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गहलोत म्हणाले की, मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे, आम्हालाही नवीन पिढी आवडते, भविष्य त्यांचेच आहे. हे नवीन पिढीचे नेते, ते केंद्रीय मंत्री झाले, प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, आमच्या काळात आम्ही काय-काय केले हे ठाऊक असते, तर त्यांना नीट समजले असते. सफाईदार इंग्रजी बोलणे, माध्यमांना चांगले बाइट देणे आणि देखणे असणे हे सर्व काही नाही. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणे आणि वचनबद्धता, हे सर्व काही विचारात घेतले जाते असे गहलोत यांनी सुनावले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!