जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनाचा हल्ला ; एक जवान शहीद

शेअर करा !

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीर येथील सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्त घालणार्‍या ताफ्यावर (सीआरपीएफ) अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. यात सीआरपीएफ १७९ बटालियनचा एक जवान शहीद झाला असून 3 जखमी झाले आहेत. तर,एका नागरिकाचादेखील गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

store advt

 

सोपोरमध्ये निगराणी करणाऱ्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये चार जवान आणि एक नागरिक जखमी झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जवानांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा फोर्सवर हल्ल्याची सहा दिवसात ही दुसरा घटना आहे. यापूर्वी शुक्रवारी अनंतनागच्या बिजबेहडा येथे सीआरपीएफ तुकडीवर हल्ला झाला होता. यामध्ये एक जवान शहीद तर ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!