जन्मतःच चिमुकलीला कोरोनाची बाधा अन तब्बल २७ दिवसांनी ” मेरे घर आई एक नन्हीं परी ” चा जल्लोष !! (व्हिडिओ)

 

 

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील एक  चिमुकली …  तिच्या आईला असलेली  कोरोनाची बाधा जन्मतःच  तिलादेखील झाली होती. या चिमुकलीने २७ दिवस झुंज देवून कोरोनावर मात  केली ! अन मग काय ….  सगळ्या घराने आज  तिच्या चिमुकल्या सोनपावलांचे आगमन झाल्यावर  ” मेरे घर आई एक  नन्हीं परी ”  चा जल्लोष केला !!

अंशू योगेश चौधरी या कॉविड पॉझिटिव्ह महिलेला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूती झाल्यानंतर  नवजात बाळाला श्वास घेण्यास त्रास होत आहे, म्हणून 29 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग विभागात दाखल करण्यात आले होते.  बाळाचा पहिला स्वॅब  निगेटिव्ह आला. परंतु बाळाचा  श्वासाचा त्रास सुरूच  होता. म्हणून हृदयाची तपासणी करून घेतली  त्या तपासणीत  atrial septal defect असल्याचे समजले.  बाळाच्या  पांढऱ्या पेशी खूप जास्त वाढल्याने व  श्वासाचा त्रास वाढल्याने प्रोटोकॉलनुसार दुसरा स्वॅब  सातव्या दिवशी पुन्हा पाठवला. तो पॉझिटिव्ह आला. तिला योग्य ती काळजी घेऊन  कार्यरत स्टाफ व टीमने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले.  २७ दिवसांनी ही बाळाची व एसएनसीयु टीमची झुंज यशस्वी ठरली. अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. अखिलेश खिलवाडे, डॉ.शैलजा चव्हाण आदी  वैद्यकीय पथकाने परिश्रम घेतले. आज २७  व्या दिवशी बाळ सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

तुकारामवाडीतील चिमुकली  व तिच्या आईच्या स्वागतासाठी कुटुंबीयांनी घर विविध रंगीबेरंगी  फुगे व फुलांनी सजविले होते.   तिचे मोठे काका-काकू, चुलत भाऊ-बहिण, आत्या, मावशी व आजी-आजोबा व त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. चिमुकलीचे  आपल्या आई-वडिलांसह आगमन होताच तिच्या आत्याने त्यांचे कुंकुमतिलक करून स्वागत केले. चुमुकली लक्ष्मी घरी आल्याने कुटुंबियांनी फुले उधळत त्यांचे स्वागत केले. तर ” हम खुश हुये हम खुश हुये ” म्हणत व कॉलोनीत  जिलेबी  वाटून आनंद साजरा केला.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.