जनसेवकाने दिली साथ रुग्णांने केली कोरोनावर केली मात

पारोळा प्रतिनिधी । टिटवी तांडा येथील रहिवासी कलाबाई दिनकर जाधव यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा मुलगा कृष्णा  याने नगरसेवक पी. जी. पाटील यांना  दुरध्वनीद्वारे मदत करण्याची विनंती केली.   नगरसेवक पाटील यांनी तत्काळ कुटीर रूग्णालयात येण्याचे सागंत सर्वतोपरी मदत केल्याने १२ दिवसांनी कलाबाई जाधव ह्या पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. 

कृष्णा जाधव याने नगरसेवक पी. जी. पाटील यांना  फोन केला की, माझ्या आईची तब्येत सिरीयस  आहे. त्यांचा ऑक्सिजन लेवल ६०  ते ६२  येत आहे. एच आर सिटीचा स्कोर २४  आला आहे. माझी परिस्थिती हलाखीची आहे, मला आपण मदत करावी अशी त्यांनी नगरसेवक पीजी पाटील यांना विनंती केली.  त्यांनी धीर दिला, तू घाबरू नको, तात्काळ तुझ्या आईला कुटीर रुग्णालयमध्ये घेऊन ये सांगितले व त्यांना ऍडमिट करण्यात आला, पेशंटची कंडीशन खराब होती. त्याला व्हेंटिलेटरची गरज  असतानासुद्धा डॉक्टर टीमने चांगला प्रयत्न केला. डॉ. श्रीनाथ चौधरी, डॉ. जागृती पाटील, डॉ. प्रियंका बडगुजर, सिस्टर सुनिता मोरे, कोमल बिऱ्हाडे, मंगला पाटील, वार्ड बॉय प्रेम वानखडे, रमेश वानखडे, रामकृष्ण पाटील, भुषण पाटील, दीपक पाटील, प्रसाद राजहंस, दीपक सोनार, नगरसेवक पी.जी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिनेश लोहार सर्वांनी त्या परिवाराला धीर दिला. आपापल्यापरीने सर्वांनी त्यांना आपल्यापरिवारातील सदस्य समजून सर्वांनी तेरा दिवस मदत केली.  आज अखेर त्या बहिणीचा नगरसेवक पी. जी. पाटील यांनी सत्कार करून पेढा भरून आनंदात घरी रवाना केलं. दिनकर वासराम जाधव, कलाबाई जाधव व कृष्णा जाधव परिवाराने सर्वांना आशीर्वाद दिला व माझ्या आईलापण वाचलं त्याबद्दल सर्वांचे त्याने आभार व्यक्त केले.  आमच्या गावाला सर्वांनी या असे आवर्जून सांगितले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.