जनमत प्रतिष्ठानतर्फे नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । स्व. किसन नाले स्मरणार्थ ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याशिबिराचे उद्घाटन महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

 

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी जनमत प्रतिष्ठान हा माझाच परिवार आहे असल्याचे गौरोद्गर काढले.  यावेळी सर्वांनी एक वृक्ष लावावे व आपल्या आजूबाजूच्या परिसर स्वच्छ ठेवावा अशी शपथ ग्रहण करण्यात आली. कलाशिक्षक सुनील दाभाडे यांच्या चित्राचे  ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने त्यांचा महापौर जयश्री महाजन यांनी  सत्कार करून सन्मान केला. शिबिरात नेत्ररोग तपासणी डॉ. राहुल महाजन यांनी केले. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,, अॅड. हेमंत दाभाडे, शक्ती महाजन, ललित धांडे, गणेश नाले, कलाशिक्षक सुनील दाभाडे,  हर्षाली पाटील, करण राठोड, अंकिता शिंपी,  ईश्वर कोळी, राहुल कोळी, गायत्री ठाकरे, सचिन सैंदाणे,  प्रकाश सपकाळ, रेड प्लस सोसायटीचे भरत गायकवाड आदी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!